या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याचे आदेश : कृषी मंत्री मुंढे

नुकसान भरपाई : जिल्ह्याला सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीचा मोठा फटका बसला होता. या परिस्थितीत प्रशासनाच्या वतीने व्यापक प्रमाणात पंचनामे सुरू केले आहेत. आठवडाभरात पंचनामे पूर्ण होतील. पंचनाम्यानंतर शेतीच्या नुकसानाची मदत विनाविलंब शेतकऱ्यांना देण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मंगळवारी (ता.१७) नांदेड येथील माता गुजरीजी विसावा उद्यानातील स्मृतिस्तंभावर मानवंदना व मुख्य शासकीय ध्वजवंदन कार्यक्रमानंतर ते बोलत होते. सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमधील सर्व नुकसाना संदर्भातील पंचनामे अंतिम टप्प्यात असून तातडीने शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी या वेळी दिली.

मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या लढ्याचा गौरवशाली इतिहासाला या वेळी त्यांनी उजाळा दिला. या वेळी खासदार, आमदार, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, विशेष पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, पोलिस अधीक्षक अविनाश कुमार, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, रेल्वेच्या विभागीय क्षेत्रीय व्यवस्थापक नीती सरकार व ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानींची उपस्थिती होती.

सन २०२३ मध्ये झालेल्या नुकसानीपोटी एकट्या नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ४४६ कोटी रुपये वाटप यापूर्वी करण्यात आले आहे असेही त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना सिंचनाचा राजमार्ग दाखविणारी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी नव संजीवनी ठरत आहे. ७.५ एचपीच्या कृषी पंपांना मोफत वीज यामार्फत दिली जात आहे. नुकसान भरपाई

गेल्यावर्षीच्या संभाजीनगर येथील मंत्रिमंडळाच्या बैठकीत जिल्ह्यातील उर्ध्व पैनगंगा प्रकल्पासाठी ७ हजार ६५५ कोटी किंमतीच्या सुधारित प्रशासकीय प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यातील बाभळी येथील मध्यम प्रकल्प, जिल्ह्यातील उनकेश्वर येथील उच्च पातळी बंधारा प्रकल्प, मुखेड तालुक्यातील लेंडी प्रकल्पासंदर्भात शासन सकारात्मक असून जुन्या प्रकल्पांना पूर्णत्वास नेवून या प्रकल्पांच्या कामांना गती देण्यात येईल असे आश्वासन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले. नुकसान भरपाई

Leave a Comment