Pik Vima Bharpai : पीकविम्याचे आणखी किती पैसे मिळणार ? रब्बीचा पीकविमा शेतकऱ्यांना किती मंजूर झाला ?

Pik Vima Bharpai गेल्या हंगामातील खरिप आणि रब्बी हंगामातील विमा भरपाईची अनेक शेतकरी आजही वाट पाहत आहेत. गेल्या खरिपात विक्रमी ७ हजार ३९६ कोटी रुपयांची भरपाई शेतकऱ्यांना मंजूर झाली होती. खरिपातील एकूण मंजूर भरपाईपैकी तब्बल ५ हजा २६१ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. तर २ हजार १३५ कोटी रुपये शेतकऱ्यांना वाटप करणे बाकी आहेत. यापैकी बहुतांशी रक्कम ६ जिल्ह्यांमधील आहे.

रब्बी हंगामासाठी ४०० कोटी रुपयांची भरपाई आली होती. रब्बीतील जवळपास सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली. पण खरिपातील २ हजार १३५ कोटी रुपयांची भरपाई कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि का रखडली? ही भरपाई कधी मिळणार ? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.

तर रखडलेल्या एकूण रकमेपैकी २ हजार ९२ कोटी रुपये ऑरिएंटल कंपनीकडे आहेत. ऑरिएंटल कंपनीची विमा भरपाई ११० टक्क्यांपेक्षा जास्त झाली. बीड पॅटर्ननुसार ११० टक्क्यांपेक्षा जास्त भरपाई देणी असल्यास राज्य सरकारला वाढलेली भरपाई द्यावी लागते. त्यामुळे खरिप २०२३ मधील ऑरिएंटल कंपनीकडे असलेल्या ६ जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांची भरपाई रखडली. ही जिल्हे चंद्रपूर, जळगाव, नाशिक, नगर, सोलापूर आणि सातारा आहेत. राज्य सरकारकडे आलेली भरपाई दिल्यानंतर शेतकऱ्यांना ही भरपाई मिळणार आहे. Pik Vima Bharpai

म्हणजेच काय तर बहुतांशी शेतकरी पीक विम्याची वाट पाहत असले तरी केवळ ६ जिल्ह्यांमधील पीकविमा रखडला आहे. कारण हे जिल्हे ऑरिएंटल कंपनीकडे असल्याचे सांगण्यात आले. म्हणजेच इतर जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना काही प्रकरणे वगळली तर भरपाई देऊन झाली.

आता मागच्या खरिपात पाऊस कमी होता. त्यामुळे पिकांचे नुकसान जास्त झाले होते. त्यामुळे खरिपात विक्रमी भरपाई मंजूर झाली होती. पण ही भरपाई आत बहुतांशी जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना पूर्ण देऊन झाली. यापुढे केवळ ज्यांची प्रकरणे प्रलंबित आहेत अशा मोजक्या शेतकऱ्यांनाच यापुढच्या काळात विमा भरपाई मिळू शकते.

रब्बीचा विचार केला तर रब्बीसाठी शेतकऱ्यांना खूपच कमी भरपाई मंजूर झाली होती. खरिपात ७ हजार ३९६ कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली होती. पण रब्बी हंगामात केवळी ४०० कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर झाली होती. रब्बी हंगामातही पिकांचे नुकसान झाले होते. मात्र भरपाई अगदी नगण्य मिळाली. रब्बी हंगामात मंजूर झालेली जवळपास सर्व भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे, अशी माहिती कृषी विभागाने दिली.

Leave a Comment