अवकाळीच्या नुकसान भरपाईसाठी २८.६२ कोटी निधी आला, तालुकानिहाय यादी पहा

जिल्ह्यात फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे महिन्यात अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात शेतीपिकांचे नुकसान झाले होते. अवकाळीच्या नुकसान भरपाईसाठी शासनाने २८ कोटी ७२ लाख ३६ हजार रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. याप्रकरणी बाधित शेतकऱ्यांच्या याद्या डीबीटी पोर्टलवर अपलोड करण्याचे संबंधित तहसीलदारांना निर्देश देण्यात आले आहेत.

उन्हाळ्याच्या प्रारंभी दरवर्षीच नांदेड जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसतो. अनेकवेळा गारपीटही होते. परंतु ती साधारण एप्रिल ते मे महिन्यात होते. परंतु यंदा फेब्रुवारी, मार्चचा पहिला पंधरवडा उलटत नाही तोच अवकाळीने तडाखा दिला आहे. माभोकर मतदारसंघात अवकाळीने अक्षरशः हैदोस घातला होता.

यासंबंधी प्रशासनाकडून पंचनामे करण्यात येऊन शासनाकडे मदतीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला होता. यात फेब्रुवारीत २० हजार ७०० शेतकऱ्यांचे ११ हजार ९११ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते.

यासाठी २० कोटी ६२ लाख ७३ हजार ८०० रुपये, मार्चमध्ये २ हजार ९०० शेतकऱ्यांचे एक हजार २४७ हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीपोटी २ कोटी ८२ लाख १६ हजार रुपये, एप्रिलमध्ये १ हजार ७३३ शेतकऱ्यांचे एक हजार ६४ हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीपोटी दोन कोटी ८८ लाख ३७ हजार ८१६ व मे महिन्यात ९२३ शेतकऱ्यांचे ७४५ हेक्टर क्षेत्र बाध‍ित झाले आहे. त्यासाठी दोन कोटी ३९ लाख ९ हजार रुपये, असे एकूण २८ कोटी ७२ हजार ३६ हजार ६१६ रुपये निधीला मंजूरी मिळाली आहे. अवकाळीच्या नुकसान भरपाईसाठी २८.६२ कोटी निधी आला

तालुकानिहाय यादी पहा

  • मुखेड एक कोटी ९० लाख ४५ हजार २००,
  • धर्माबाद एक कोटी २८ लाख ९४ हजार,
  • उमरी १४ कोटी १५ लाख ३० हजार,
  • भोकर २५ लाख १६ हजार,
  • नांदेड १९ लाख ८४ हजार (एप्रिल), ३ लाख ३ हजार ८४० (मे),
  • अर्धापूर ३६ हजार ७६० (मार्च), २ कोटी १४ लाख २९ हजार (एप्रिल), दोन कोटी २१ लाख ४८ हजार ६०० (मे) ,
  • लोहा चार लाख २१ हजार २०० (एप्रिल), ९ लाख ५९ हजार ७६० (मे),
  • बिलोली ४३ हजार २०० (मे),
  • भोकर २५ लाख १६ हजार (फेब्रुवारी), ८७ हजार ४८०(मे),
  • किनवट २ कोटी २१ लाख ९३ हजार ६४० (मार्च), १४ लाख ४० हजार (एप्रिल), ३ कोटी २४ हजार (मे),
  • माहूर २८ लाख ८५ हजार (एप्रिल),
  • मुदखेड ५ लाख ४० हजार (एप्रिल),
  • नायगाव २९ लाख ३७ हजार (मार्च)
  • देगलूर ३० लाख ४८ हजार (मार्च).

Leave a Comment